जि.प. शाळा सिद्राममळा च्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत ……….

नवीन काही

सध्या आपल्याला कंप्यूटर वर बरेच काम करावे लागत आहे त्यामुळे आपनास काही शॉर्टकिट सांगत आहे ,

ही पोस्ट आपन सेव करून ठेवा आणि उपयोगात आणा

विंडोस कीबोर्ड शोर्टकट

≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡

CTRL+C = कॉपी

CTRL+X = कट

CTRL+V = पेस्ट

CTRL+Z = अन्डू

DELETE = डिलीट

SHIFT+DELETE = डिलीट (बिना रिसाईकिल

बिन रखे)

F2 = रिनेम

CTRL+RIGHT ARROW = कर्सर को अगले शब्द के शुरू

में रखता है

CTRL+LEFT ARROW = कर्सर पिछले शब्द के शुरू में

रखता है.

CTRL+DOWN ARROW = कर्सर को अगले पैराग्राफ

के शुरू में रखता है .

CTRL+UP ARROW = कर्सर को पिछले पैराग्राफ

के शुरू में रखता है.

CTRL+A = सेलेक्ट आल

F3 = सर्च

ALT+ENTER = सेलेक्टेड आइटम की प्रोपर्टी

ALT+F4 = एप्लीकेशन विंडो को बंद करता है

ALT+SPACEBAR = एक्टिव विंडो का शोर्टकट

मेनू

CTRL+F4 = डाकुमेंट विंडो को बंद करता है

ALT+TAB = खुले हुए आइटम्स के बीच स्विच करता

है

ALT+ESC = Cycle जिस क्रम में विंडोस खुले

F4 = एड्रेसबार लिस्ट

CTRL+ESC = स्टार्ट मेनू

F10 = एक्टिवेट मेनूबार

F5 = रिफ्रेश एक्टिव विंडो .

BACKSPACE = बेक

ESC = केंसिल कर्रेंट टास्क

SHIFT जब DVD इन्सर्ट हो = ऑटोरन को रोकता

है

TAB = फोकस आगे बढाना

SHIFT+TAB = फोकस पीछे करना

F1 = हेल्प

Window = स्टार्ट मेनू

window+BREAK = सिस्टम प्रोपर्टी

window+D = डेस्कटॉप

window+M = मिनिमाईज़ आल

window+Shift+M = रिस्टोर आल

window+E = माय कम्प्युटर

window+F = सर्च

CTRL+ window+F = सर्च कम्प्युटर

window+ L = सर्च कम्प्युटर या स्विच यूजर

window+R = रन डायलोग बॉक्स

window+U = यूटिलिटी मेनेजर

Windows Explorer

END = एक्टिव विंडो का बाटम

HOME = एक्टिव विंडो का टॉप

NUM LOCK+ * = सेलेक्टेड फोल्डर के सभी

सबफोल्डर

NUM LOCK+ numeric keypad (+) = सेलेक्टेड

फोल्डर का कंटेंट

NUM LOCK+numeric keypad (-) = कोलेप्स सेलेक्टेड

फोल्डर

LEFT ARROW = कोलेप्स सेलेक्शन

RIGHT ARROW = डिस्प्ले कोलेप्सड सेलेक्शन

Windows Mediaplayer

≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡

ctrl+o ओपन

ctrl+u ओपन url

ctrl+w क्लोस

ctrl+n नई प्लेलिस्ट

ctrl+d एडिट कर्रेंट प्लेलिस्ट

ctrl+1 फुल मोड़

ctrl+2 स्किन मोड़

alt+enter फुल स्क्रीन

f 5 रिफ्रेश

ctrl+p प्ले/ पाउस

ctrl+s स्टॉप

ctrl+shift+g फास्ट प्ले

ctrl+shift+n नोर्मल प्ले

ctrl+shift+s स्लो प्ले

ctrl+b पिछला

ctrl+f अगला

ctrl+shift+b रिवाईंड

ctrl+shift+f फास्ट फारवर्ड

ctrl+h शफल

ctrl+t रिपीट

ctrl+shift+c केप्शन & subtitle

f10 वोल्यूम अप

f 9 वोल्यूम डाउन

f 8 म्यूट

ctrl+e इजेक्ट




पॅटर्न लॉक विसरलात तर?

स्मार्टफोनमध्ये जे काही बिल्टइन सिक्युरिटी फिचर असतात त्यातले सगळ्यात जास्त वापरले जाणारे सिक्युरिटी फिचर म्हणजे पॅटर्न लॉक ! स्मार्टफोन सिक्युरिटीमधला सगळ्यात वरचा लेअर म्हणजे हा ‘पॅटर्न लॉक ’. स्मार्टफोन विकत घेतला रे घेतला की, सगळ्यात आधी लोक हा पॅटर्न लॉक सेट करतात, तो सतत बदलतात. इतरांपेक्षा आपला लॉक वेगळा असावा, म्हणून धडपडतात. पॅटर्न लॉक बदलत राहणं हा अनेकांचा छंदच होऊन बसलेला असतो. हे गाडं तिथवर सुरळीत राहतं, जोवर तुमची स्मरणशक्ती तुम्हाला दगा देत नाही. पण ती कधीतरी दगा देतेच. आणि मग या नात्यामध्ये दरार  पडते. स्वत:च सेट केलेले पॅटर्न काहीजण विसरून जातात मग होते खरी पंचाईत. कारण पॅटर्न लॉक विसरलं तर स्मार्टफोन कसं वापरणार? ते लॉक ‘अनलॉक’ करावं लागतं आणि जिथं ऐनवेळेस आपला नेहमीचा पॅटर्न आठवत नाही, तिथं अनलॉक करायचं कसं आठवावं? पण ते माहिती तर पाहिजे, नाहीतर पॅटर्न लॉक उघडता येत नाही, म्हणून रडत बसायची पाळी येते. तशी तुमच्यावर येऊ नये, म्हणून या काही सोप्या आयडिया लक्षात ठेवा..

पॅटर्न लॉक अनलॉक कसं करतात ?

पद्धत -1

गुगलचं युजरनेम पासवर्ड जर तुम्ही तुमचा पॅटर्न लॉक  विसरलात तर ते अनलॉक  करण्याची ही एक सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे. तुम्ही पाचवेळा प्रयत्न करुनही  अनलॉक  होत नसेल तर खाली फरगॉट पॅटर्न हा एक ऑप्शन असतो तो पहा. त्यावर क्लिक केलं की तुम्हाला गुगल अकाऊंचं युजर नेम आणि पासवर्ड विचारला जातो. आजकाल जवळपास नव्वद टक्के स्मार्टफोन धारकांकडे गुगल अकऊंटचं युजर नेम आणि पासवर्ड म्हणजेच गुगलचं अकाऊंट असतंच. त्यामुळे हे गुगलअकऊंटचं युजर नेम आणि  पासवर्ड टाकला की काम झालं. त्यानंतर मुळ स्वरुपात म्हणजेच स्क्रिन ओपन होतो. नंतर तुम्ही पुन्हा पॅटर्न बदलवून नवीन लॉक लावू शकता.

पद्धत -2

जर तुमच्याकडे गूगल अकाउंटचं यूझर नेम आणि पासवर्ड नसेल किंवा तो पासवर्ड फोन घेत नसेल किंवा तुम्ही गूगलचाही पासवर्ड विसरला असाल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याठिकाणी इंटरनेटची रेंजच नसेल तर काय? कारण तसं झालं तर गूगलचं यूझर नेम आणि पासवर्ड व्हेरिफाय होतच नाही.  त्यामुळे तुम्ही पॅटर्न अनलॉक  करू शकत नाही. त्यावेळी दुसरी एक पद्धत वापरता येते. त्यासाठी तुम्हाला स्मार्टफोन ऑफ करावा लागेल त्यानंतर स्मार्टफोन रिकव्हरी मोडमध्ये चालू करावा लागेल. स्मार्टफोन रिकव्हरी मोडमध्ये चालू करण्याच्या पद्धती प्रत्येक  हॅण्डसेटच्या वेगवेगळ्या असू शकतात. मात्र, कॉमन पद्धत म्हणजे पॉवर बटन प्लस व्हॉलूम डाउन हे बटन प्रेस केलं की बरेच स्मार्टफोन रिकव्हरी मोडमध्ये चालू होतात. एकदा का तुमचा स्मार्टफोन रिकव्हरी मोडमध्ये चालू झाला की,त्यामध्ये बरेच ऑप्शन तुम्हाला दिसतील. त्यापैकीच एक म्हणजे फॅक्टरी रिसेट. तसं रिसेट करा. पण लक्षात ठेवा, हे असं करताना तुमचा सगळा डेटा जातो. त्यामुळे आधी फोनचा बॅकअप घ्या. म्हणजेच फोटो किंवा म्युङिाक फाइल्स किंवा आणखी काही डेटा फाइल्स असतील तर त्याचाही बॅकअप घ्या. स्मार्टफोनचा बॅकअप घेण्यासाठी तुम्हाला स्मार्टफोन कॉम्प्युटरच्या यूएसबी पोर्टला जोडावा लागेल.त्यानंतर माय कॉम्प्युटरमध्ये जाऊन तुमच्या डिटेक्ट झालेल्या स्मार्टफोन ड्राइव्हमधून तुमचा डेटा कॉपी करून घ्या.
स्मार्टफोन रिसेट करण्यापूर्वी स्मार्टफोनमधील एसडी कार्ड (मेमरी कार्ड) सेफ्टीसाठी म्हणून काढून घ्या. त्यानंतरच स्मार्टफोन रिसेट करा. म्हणजे स्मार्टफोन एसडी कार्ड (मेमरी कार्ड) वरील डेटा सेफ राहील.
स्मार्टफोन रिसेट होऊन पॅटर्न लॉक  निघून जाईल आणि तुमचा स्मार्टफोन परत मूळ रुपात येईल. फक्त हे सारं करताना डोकं शांत ठेवा, तरच डाटा वाचेल! पॅटर्न लॉक सेट कसं करतात? फोनच्या मेन्यूमधून सिस्टिम सेटिंगमध्ये जा. तिथं ‘पर्सनल’मध्ये एक सिक्युरिटी हे ऑप्शन असतं. त्यावर क्लिक केल्यानंतर स्क्रिन सिक्युरिटी हे ऑप्शन दिसेल. त्याखाली स्क्रिनलॉक वर क्लिक केलं की, आतमध्ये सात वेगवेगळे स्क्रिन लॉक ऑप्शन दिसतात. नन, स्लाइड, फेस अनलॉक, व्हॉइस अनलॉक, पॅटर्न, पिन आणि शेवटचं म्हणजे पासवर्ड.  पॅटर्नवर क्लिक केलं की, ‘चूझ यूवर पॅटर्न’ असा पर्याय येतो. त्यातून एक पॅटर्न निवडून ते तुम्ही कन्फर्म केलं की,  झालं तुमचे पॅटर्न लॉक सेट.

अनिल भापकर anil.bhapkar@lokmat.काम

  • माहिती स्रोत: लोकमत, ऑक्सिजन, १० जुलै २०१५.