जि.प. शाळा सिद्राममळा च्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत ……….

Monday 23 November 2015

सर्व शिक्षा अभियान - संगणकाधारित शिक्षण

र्जावृध्दी - संगणकाधारित शिक्षण

मागील दशकापासून संगणकीय तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावायला सुरूवात केली. सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य सरकारने जिल्ह्यांतील अनेक शाळांमध्ये संगणकाधारित शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण उत्पादकता तसेच शिक्षकांची परिणामकारकता वाढवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनक्षमता विकसीत करणे, हा संगणकाधारित शिक्षणाचा मुख्य हेतू आहे. आकर्षक चित्रे, चलतचित्रे, संगीत आणि निवेदनाच्या आधारे आपला विषय अधिक प्रभावीपणे शिकवण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची सोय संगणकाधारित शिक्षणाव्दारे उपलब्ध होते.

शाळांमध्ये संगणकाधारित शिक्षणाची अंमलबजावणी करताना राज्याने पुढील हेतू निश्चित केले आहेत.

  • शिक्षणाचा दर्जा सुधारणे.
  • गळतीचे प्रमाण घटविणे आणि धारकता वाढवणे.
  • शिक्षण आकर्षक आणि प्रभावी करणे.
  • शिक्षकांना प्रभावी आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून सक्षम करणे.
  • चित्रे, चलतचित्रे, आवाजाच्या माध्यमातून संकल्पनांवर आधारित शैक्षणिक साहित्याचा डीजीटल वापर.
  • विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या अधिक जवळ नेणे.
2011-12 या वर्षात राज्यातील 5251 शाळांमध्ये संगणकाधारित शिक्षण राबवण्यात आले आणि त्यासाठी 14000 पेक्षा जास्त शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. साडेसात लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या संगणकाधारित शिक्षणाचा लाभ मिळाला.
माहिती संकलक : अतुल पगार