जि.प. शाळा सिद्राममळा च्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत ……….

Wednesday 13 January 2016

कधीतरी उपयोगी पडणार्‍या छोट्या-छोट्या गोष्टी

छोट्या - छोट्या गोष्टी कधी-कधी फार उपयोगी पडतात. एखाद्या गोष्टीचे महत्व त्या गोष्टीची जेव्हा गरज पडते त्याच वेळी कळते. अशाच काही क्वचित उपयोगी पडणार्‍या छोट्या-छोट्या इथे गोष्टी दिल्या आहेत. १) बर्‍याच वेळा आपण चुकून चुकीच्या बटनावर किल्क करतो उदा. वर्डमध्ये काम करीत असलेली फाईल बंद करताना 'Yes' एवजी 'No' ह्या बटनावर क्लिक करतो. अशाप्रकारे जर कधी तुम्ही चुकून चुकीच्या बटणावर क्लिक केलात तर माऊसचे बटन न सोडता त्या दाबलेल्या अवस्थेमध्येच माऊस त्या बटनापासून दूर न्यायचा व बटन सोसायचे. २) एखादी फाईल डिलीट केल्यावर ती 'रिसायकल बिन' ( Recylce Bin ) मध्ये जाते व तीला कायमची डिलीट करायची असल्यास आपण 'रिसायकल बिन' मध्ये जाऊन ती फाईल डिलीट करतो. त्याएवजी एखाद्या वेळेस जर एखादी फाईल कायमची डिलीट करायची असल्यास कि-बोर्ड वरील 'Shift' चे बटण दाबून 'Delete' चे बटन दाबावे. अशा वेळी ती फाईल कायमची डिलीट करायची आहे का असे कॉम्प्युटरवर विचारतो व ती फाईल 'रिसायकल बिन' मध्ये न टाकता कायमची कॉम्प्युटरमधुन नष्ट करतो. ३) एखादी CD कॉम्प्युटरमध्ये टाकली की ती आपोआप सुरु होते. गाण्यांच्या CD बाबत असे सतत घडते. अशा वेळी ती अथवा इतर दुसरी CD आपोआप सुरु होण्यापासून थांबवायचे असल्यास ती CD कॉम्प्युटरमध्ये टाकल्यावर काही सेकंद कि-बोर्ड वरील Shift हे बटन दाबून धरावे. सुचना - सहजच.कॉम वरील माहिती संबंधी सहजच.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत. - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.