जि.प. शाळा सिद्राममळा च्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत ……….

Wednesday 2 September 2015

परिसर सहल

आज शाळेची

परिसर सहल  फुरसुंगी रेलवे स्टेशन व रामदरा शिवालय येथे आयोजित करण्यात आली.   
*रेल्वे सिग्नलचे अर्थ 
*गाड्यांचे नियोजन 
*आपत्कालीन उपाययोजना 
*गाडी येण्यापूर्वीची सूचना 
*गाड्यांचे प्रकार 
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी स्टेशन प्रबंधकांना विचारली . प्रबंधकांनि देखील सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे शंका केले. 
एक जिवंत शैक्षणिक अनुभव मुलांना दिल्याचे समाधान सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर दिसत होते. दुपारच्या सत्रात रामदरा शिवालयात जेवणाचे नियोजन करण्यात आले होते. चालून दमलेल्या बच्चे कंपनीने मेजवानीचा यथेच्छ आनंद लुटला . 
संध्याकाळी ४ च्या सुमारास पावले परतीच्या वाटेने फिरली . शरीराने दमलेली  नाजूक फुले आजच्या परिसर सहलीमुळे मनाने मात्र अगदी टवटवीत फुलली होती .
 विद्यार्थ्यांना एक नवीन अनुभव मिळाला आणि  मला आठवणींच्या कोपर्यात साठविण्यासाठी अविस्मरणीय असा अजून एका जिवंत अध्यापनाचा दिवस  ………।